माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे

योजनेचा उद्देश:

  1. महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगारासाठी प्रोत्साहन देणे.
  2. त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
  3. महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
  4. महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींच्या सशक्तीकरणाला चालना देणे.
  5. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे स्वरूप:

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रु. 1,500/- इतकी रक्कम थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे दिली जाईल. तसेच, केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु. 1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता:

अपात्रता :

आवश्यक कागदपत्रे:

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.
(३) महाराष्ट्राचाअधिवास प्रमाणपत्र [प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.]

(४)महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

(५) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपर्यंत असणे आवश्यक). पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

(६) नवविवाहितेच्या बाबतीत, रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

(७) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(८) लाभार्थी महिलेचे हमीपत्र व  फोटो आवश्यक आहे.

नवीन ऑनलाइन पोर्टल:

click here

अधिक माहितीसाठी:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाइटला भेट द्या.
  • टोल फ्री क्रमांक: 1800-180-1234

जी आर डाउनलोड: click here

हमीपत्र: click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top